जिम ट्रेनरवर गोळी झाडण्याचा प्रयत्न

Foto

औरंगाबाद: शिवाजीनगर बाराव्या योजनेत असलेल्या नयन जिममधील ट्रेनरला रस्त्यावर आणून त्याच्यावर गावठी कट्ट्यातूून गोळी झाडण्याचा प्रयत्न आज सकाळी 7 वाजता झाला. पण सुदैवाने दोन वेळा प्रयत्न करुनही गोळी झाडता न आल्याने ट्रेनरचे प्राण वाचले.पोलिसांनी या प्रकरणी एका युवकास अटक केली आहे. तर या प्रकरणातील अन्य दोन जण पसार झाले आहेत. सकाळी घडलेल्या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात दहशत पसरली आहे.

जितेंद्र राऊत (25), शहादेव महादेव सोनवणे (23) व सलीम (27) सर्व आरोपी सीसीटीव्हीत कैदनयन जिमच्या समोरील भागांत खेडकर हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या चाहूबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. रोडवरील कॅमेर्‍यात  अलीम सोबत तीनही आींरोपी झटापट करताना दिसत आहेत.

परिसरात दहशत 
शिवाजीनगर परिसर नेहमीच गुन्हेगारी कारवाईने चर्चेत राहिलेला आहे. आज पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्यासाठी घटना घडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.सर्व रा. भारतनगर-आनंदनगर अशी गोळीबाराचा प्रयत्न करणार्‍या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन शेख अलीम शेख नवाब (वय- 27), रा. गारखेडा गाव हा शिवाजीनगर परिसरातील 12  वी योजना नयन जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री शेख अलीमने नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजेच्या सुमारास जिम बंद केली. तेव्हा सलीम व त्याचा भाऊ अनिसखान सोबत शहानूरमिया दर्गा येथे चहा पिण्यासाठी गेले. चहा पिऊन ते शिवाजीनगरकडून घराकडे जात होते. दरम्यान रात्री 11.30 वाजता शिवाजीनगर परिसरातील क्रिस्टल वाईन शॉपजवळ यादीस आरोपी हे दारुच्या नशेत उभे होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला. शेख अलीमने तो वाद मिटवून सर्वजण घरी गेले. 

आज  सकाळी अलीमने नेहमीप्रमाणे जिम उघडली. सकाळी 7.30 वाजता जितेंद्र राऊत व त्यांच्यासोबत दोन मित्र हे नयन जिमवर पोहोचले. त्यांनी अलीमला बाहेर रोडवर बोलावले. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी जितेंद्र राऊतने कंबरेजवळ ठेवलेला गावठी कट्टा काढून अलीमच्या पोटाला लावला. त्यावेळी झटापट झाली असता गावठी कट्ट्यातून राऊंड जमिनीवर पडले. त्यामुळे अलीमने आरडाओरड केली असता तिन्ही आरोपींनी  घटनास्थळावरुन पळ काढला. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी कळवली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिस उपायुक्‍त राहूल खाडे, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी भेट दिली आहे